Posts

Showing posts from April, 2021

पेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का?

Image
   पेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का? हाडे ठिसूळ होण्याच्या समस्येला वैद्यकीय भाषेमध्ये ऑस्टिओपोरोसिस असे म्हणतात. ऑस्टिओपोरोसिसमधे हाडे ठिसूळ होण्याची प्रक्रिया जास्त होते. द्रवपदार्थ आणि हाडांमधील चरबी त्यांचे घनत्व टिकवून ठेवण्यास मदत करतात. हे दोन्ही घटक आपले शरीर मजबूत ठेवण्यात मोठी भूमिका बजावतात. जेव्हा शरीरामध्ये कॅल्शिअमसह अन्य पोषक तत्त्वांचा अभाव निर्माण होतो, तेव्हा आपल्या हाडांमधील घनत्व कमी होऊ लागते. यामुळे शरीराची हाडे कमकुवत होऊ लागतात. पेर फळाला बोली भाषेमध्ये नाशपाती या नावानंही ओळखले जाते. हे फळ एप्रिलपासून ते ऑक्टोबरपर्यंत बाजारामध्ये उपलब्ध असते. या फळाच्या सेवनामुळे शरीराला भरपूर आरोग्यदायी लाभ मिळतात. पण यातील पोषक घटक आपल्या हाडांसाठी सर्वाधिक फायदेशीर असतात. पेरमध्ये आपल्या शरीराचे पीएच स्तर संतुलित ठेवण्याची क्षमता असते. या फळामध्ये बोरोना नावाचे तत्त्व असते. बोरोना आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असते. कारण हे आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या कॅल्शियम तयार करण्यास मदत करते. हे कॅल्शिअम आपल्या हाडांना बळकटी देण्याचे कार्य करतात आणि ऑस...

पेर चे प्रकार

Image
 पेर चे  प्रकार :   आशियाबाहेरील देशांत   ‘विल्यम्स ’  (अमेरिकेत  ‘बार्टलेट ’ ) प्रकाराची लागवड सर्वाधिक आहे. कॅनडा व संयुक्त संस्थानांत  ‘ब्यूरे बॉस्क ’ ,  ‘ब्यूरे द अँजौ ’आणि  ‘विटर नेलिस ’यांची लागवड करतात. इंग्लंड व नेदरलंड्समध्ये  ‘कॉन्फरन्स ’आणि इटलीत विल्यम्सशिवाय  ‘क्यूरेटो ’ ,  ‘कोसिया ’इत्यादींवर भर आहे. फ्रान्स इटलीत  ‘पासे क्रासने ’हा प्रकार विशेष लागवडीत आहे. १८४९ मध्ये फ्रान्समध्ये  ‘डॉयने दू कॉमिस ’ह्या अत्युत्तम जातीचे उत्पादन केले गेले. आशियाई देशांत स्थानिक जातींचे प्रकार लावले जातात  परंतु ते इतरांहून कमी प्रतीचे मानले आहेत. पेअरची झाडे साधारणपणे लावल्यापासून सु. चार ते सात वर्षांत फळे धरतात आणि त्यांचा आयुःकाल ५०–७५ वर्षे असतो. काळजीपूर्वक खुडणे , आधार देणे इ. प्रक्रिया केल्यास आकार भरमसाट वाढत नाही. –२९ ° से. ते –३५ ° से. इतक्या कमी तापमानात ती झाडे जगत नाहीत. मध्यम प्रकारच्या उन्हाळ्यात त्यांचे फलोत्पादन चांगले होते. भारतात  ‘यूरोपीय ’  ( पायरस कॉम्यूनिस ) व  ‘पौर्वात्य ’ ...

पेर फळावरील रोग व कीड

Image
  रोग व कीड : नेक्ट्रिया  वंशातील कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे) होणारा सालीवरील खैरा रोग आणि  व्हेंचुरिया पायरिना  कवकामुळे होणारा खपली (खवडा  स्कॅब) रोग हे प्रमुखपणे आढळतात. खैरा रोग झालेली मृत झाडे जाळून टाकणे , जिवंत झाडांच्या रोगट फांद्या कापून टाकणे व इतर भागांवर बोर्डो पेस्ट लावणे हे उपाय आहेत. खपली रोगासाठी चुना-गंधक मिश्रण फवारतात. सॅन ओझे या नावाच्या खवले कीटकांवर सफरचंदावरील त्या किडीप्रमाणे उपाययोजना करतात. पानावरील भुंगेरे डीडीटीच्या फवाऱ्याने नाहीसे करता येतात.

पेर फळाची लागवड आणि मशागत

Image
  लागवड , मशागत इत्यादी :  नासपतीच्या झाडांना  ⇨ सफरचंदा पेक्षा काहीसे उबदार हवामान लागते. पाणी धरून ठेवणाऱ्या खोल व उबदार जमिनी त्यांना मानवतात. कमी प्रतीच्या जातीवर ( पा. पाशियावर ) चांगल्यांची (युरोपीय जातींची) कलमे करण्याची प्रथा आहे  डोळे भरूनही अभिवृद्धी करतात. निलगिरी भागात यूरोपीय जातींची कलमे पौर्वात्य प्रकारांवर करतात. एक वर्षाची कलमे उत्तरे कडील भागात ऑक्टोबरमध्ये आणि निलगिरी भागात जानेवारीत लावतात. दोन झाडांतील अंतर सु. ४–७ मी. ठेवतात. खत आणि मशागत बहुतांशी सफरचंदाप्रमाणे असते. छाटणी करून भिन्न आकार देतात  त्यामुळे फळेही मोठी होतात व दरवर्षी फळे मिळण्याचा संभव वाढतो. बहुतेक प्रकार स्वयंफलित नसल्याने बागेत भिन्न प्रकार लावणे आवश्यक असते. फुलांचे परागण (परागसिंचन) मधमाश्यांद्वारे घडून येते. झाडे कायम जागी लावल्यापासून सु. सात वर्षांनंतर फळे धरण्यास सुरुवात होते. पुढे ६० ते ७० वर्षांपर्यंत व्यापारी दृष्ट्या फायदेशीर होईल इतक्या संख्येने फळे मिळतात. उत्तरेकडे फळांची तोडणी जून ते नोव्हेंबर आणि दक्षिणेकडील भागांत मे ते सप्टेंबरपर्यंत असते. दर झाडामागे सु. ...

पेर फळाचे उपयोग

Image
  उपयोग :  ताजी व पक्क फळे तशीच खातात  त्यांचा रस काढून पेये बनवितात फळे डबाबंद करून विक्रीस ठेवतात. पाश्चात्त्य देशांत फळे सुकवून नंतर स्वयंपाकात वापरतात  तसेच रसापासून मद्ययुक्त पेये बनवितात. फळात साखर बेताची असल्याने मधुमेही लोकांना खाण्यास ती उपयुक्त असतात. फळात प्रथिन कमी असते. रेवाळ मगजाची फळे शिजवून खातात. फळांचे मुरंबे घालतात. फळे स्तंभक (आकुंचन करणारी) , शामक (दाह कमी करणारी) व ज्वरनाशी असतात. युरोपीय जातीच्या काही प्रकारांत पाने खंडित व चित्रित असल्याने शोभेकरिता ते प्रकार बागेत लावतात.

पेर फळाचा इतिहास

Image
  इतिहास :  इ. स. पू. अनेक वर्षांपासून पेअर लागवडीत असावे , अशी साधार माहिती मिळते. ग्रीक कवी होमर यांनी (इ. स. पू. १००० वर्षांपूर्वी असलेल्या) ॲल्सिनसच्या बागेतील फळांच्या यादीत पेअरचा उल्लेख केला असून त्यांच्या वेळच्या ग्रीकांना त्याची माहीत होती, असे दर्शविले आहे. कलमांनी अभिवृद्धी (लागवड) केलेले काही सुधारित प्रकार ख्रिस्तपूर्व काळात माहिती होते. त्या वेळेपासून युरोपात शेकडो नवीन प्रकार काढले जाऊन त्यांना नावेही दिली गेली आहेत. अमेरिकेत पेअरचा प्रवेश तेथे वसाहतींची स्थापना झाल्यावर ब्रिटिश आणि उ. यूरोपियन लोकांकडून झाला. तत्पूर्वी स्पेनमधील धर्मोपदेशकांनी मेक्सिकोत व कॅलिफोर्नियात पेअरची लागवड सुरू केली होती.

पेर फळाची प्राथमिक माहिती

Image
  ह्या स्थानिक नावाने भारतात विकली जाणारी खाद्य फळे थोडीफार सर्वांना परिचित आहेत , पण भारतात त्यांना फारसे महत्त्व नाही आणि अल्प प्रमाणातच ती काही ठिकाणी पिकविली जातात. ज्या झाडांपासून ती मिळतात त्यांचा अंतर्भाव फुलझाडांपैकी  ⇨ रोझेसी  कुलातील (गुलाब कुलातील)  पायरस  या शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या वंशात करतात. ह्या वंशात एकूण वीस जाती असून भारताबाहेरील देशांत त्यांची फळे  ‘पेअर ’ या नावाने ओळखतात. ती तेथे अत्यंत लोकप्रिय असून त्यांच्याच वंशातील  ⇨ सफरचंदा खालोखाल त्यांचा क्रमांक आहे. गुलाब कुलातील (व  प्रूनस  वंशातील) पीच (सप्ताळू) , प्लम (अलुबुखार) व चेरी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लोकप्रिय फळांपेक्षा पेअरचे उत्पादन बरेच अधिक आहे. सर्व पेअरची झाडे मूळची युरोप ते पूर्वेकडे आशियातून चीन व उ. आफ्रिका या प्रादेशिक पट्ट्यातील आहेत  त्यांपैकी कोणतीही जाती मूळची द. गोलार्ध आणि अमेरिकेतील नाही. ज्याला  ‘सामान्य पेअर ’म्हणतात ती ( पायरस कॉम्यूनिस ) आग्नेय यूरोप व प. आशिया येथील असून आजचे लुसलुशीत व रसाळ प्रकार तिच्यापासून निघालेले आहे...

पेर फळाची माहित

Image
 पेर हे  एक रसाळ फळ. भारतीय स्थानिक भाषेत या फळाला नासपती म्हणत असले तरी भारताबाहेर ते पेअर या इंग्रजी नावाने अधिक परिचित आहे. ही फळे ज्या वृक्षापासून मिळतात त्यांचा समावेश रोझेसी कुलातील पायरस प्रजातीत होतो. गुलाब, सफरचंद या वनस्पतीही रोझेसी कुलातील आहेत. सामान्यपणे पायरस प्रजातीच्या वनस्पतींना पेअर म्हणतात. या प्रजातीत सु. २० जाती असून विशेषकरून त्या समशीतोष्ण प्रदेशात आढळतात. पायरस कॉम्युनिस म्हणजे सामान्य पेअर. ही वनस्पती मूळची पूर्व यूरोप आणि पश्चिम आशियातील असून त्यापासून आजचे रसाळ आणि लुसलुशीत प्रकार विकसित झाले आहेत. आशियातील आजचे प्रकार चिनी सँडपेअर (पा. पायरिफोलिया ) या जातींपासून तयार झाले आहेत. या प्रकारातील फळांचा गर काहीसा चरबरीत आणि रवाळ असतो. भारतात जम्मू व काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि निलगिरी टेकड्या येथे काही ठिकाणी नासपतीची लागवड करतात. नासपती वृक्ष डेरेदार व पानझडी असून १०-१५ मी. उंच व सरळ वाढतात. पाने साधी, एकाआड एक, २-२.५ सेंमी. लांब, वर्तुळाकार, चिवट व तळाशी पाचरीसारखी असतात. फुले पांढरी, २-२.५ सेंमी. व्यासाची असून ती पानांच्या अक्षामध्ये येत...

पेर फळ

Image
  पेर फळाला बोली भाषेमध्ये नाशपाती या नावानंही ओळखले जाते. हे फळ एप्रिलपासून ते ऑक्टोबरपर्यंत बाजारामध्ये उपलब्ध असते. या फळाच्या सेवनामुळे शरीराला भरपूर आरोग्यदायी लाभ मिळतात. पण यातील पोषक घटक आपल्या हाडांसाठी सर्वाधिक फायदेशीर असतात.