पेर चे प्रकार : आशियाबाहेरील देशांत ‘विल्यम्स ’ (अमेरिकेत ‘बार्टलेट ’ ) प्रकाराची लागवड सर्वाधिक आहे. कॅनडा व संयुक्त संस्थानांत ‘ब्यूरे बॉस्क ’ , ‘ब्यूरे द अँजौ ’आणि ‘विटर नेलिस ’यांची लागवड करतात. इंग्लंड व नेदरलंड्समध्ये ‘कॉन्फरन्स ’आणि इटलीत विल्यम्सशिवाय ‘क्यूरेटो ’ , ‘कोसिया ’इत्यादींवर भर आहे. फ्रान्स इटलीत ‘पासे क्रासने ’हा प्रकार विशेष लागवडीत आहे. १८४९ मध्ये फ्रान्समध्ये ‘डॉयने दू कॉमिस ’ह्या अत्युत्तम जातीचे उत्पादन केले गेले. आशियाई देशांत स्थानिक जातींचे प्रकार लावले जातात परंतु ते इतरांहून कमी प्रतीचे मानले आहेत. पेअरची झाडे साधारणपणे लावल्यापासून सु. चार ते सात वर्षांत फळे धरतात आणि त्यांचा आयुःकाल ५०–७५ वर्षे असतो. काळजीपूर्वक खुडणे , आधार देणे इ. प्रक्रिया केल्यास आकार भरमसाट वाढत नाही. –२९ ° से. ते –३५ ° से. इतक्या कमी तापमानात ती झाडे जगत नाहीत. मध्यम प्रकारच्या उन्हाळ्यात त्यांचे फलोत्पादन चांगले होते. भारतात ‘यूरोपीय ’ ( पायरस कॉम्यूनिस ) व ‘पौर्वात्य ’ ...
Comments
Post a Comment