पेर फळाची लागवड आणि मशागत


 लागवड, मशागत इत्यादी : नासपतीच्या झाडांना सफरचंदापेक्षा काहीसे उबदार हवामान लागते. पाणी धरून ठेवणाऱ्या खोल व उबदार जमिनी त्यांना मानवतात. कमी प्रतीच्या जातीवर (पा. पाशियावर) चांगल्यांची (युरोपीय जातींची) कलमे करण्याची प्रथा आहे डोळे भरूनही अभिवृद्धी करतात. निलगिरी भागात यूरोपीय जातींची कलमे पौर्वात्य प्रकारांवर करतात. एक वर्षाची कलमे उत्तरे कडील भागात ऑक्टोबरमध्ये आणि निलगिरी भागात जानेवारीत लावतात. दोन झाडांतील अंतर सु. ४–७ मी. ठेवतात. खत आणि मशागत बहुतांशी सफरचंदाप्रमाणे असते. छाटणी करून भिन्न आकार देतात त्यामुळे फळेही मोठी होतात व दरवर्षी फळे मिळण्याचा संभव वाढतो. बहुतेक प्रकार स्वयंफलित नसल्याने बागेत भिन्न प्रकार लावणे आवश्यक असते. फुलांचे परागण (परागसिंचन) मधमाश्यांद्वारे घडून येते. झाडे कायम जागी लावल्यापासून सु. सात वर्षांनंतर फळे धरण्यास सुरुवात होते. पुढे ६० ते ७० वर्षांपर्यंत व्यापारी दृष्ट्या फायदेशीर होईल इतक्या संख्येने फळे मिळतात. उत्तरेकडे फळांची तोडणी जून ते नोव्हेंबर आणि दक्षिणेकडील भागांत मे ते सप्टेंबरपर्यंत असते. दर झाडामागे सु. ७० ते १२० किग्रॅ. फळे दरवर्षी मिळतात. पंजाबात व आसाममध्ये पौर्वात्य जातीची लागवड होते. पंजाबात सु. ४०० हेक्टर क्षेत्र आहे. पीक भरपूर येते मात्र फळे कमी प्रतीची असतात ती पौर्वात्य जातीची असतात व यूरोपीय जातीपेक्षा जास्त टिकतात. निलगिरी भागात ‘बेरीकाई’ प्रकार सु. २०० हेक्टर क्षेत्रात लागवडीत आहे. फळे कुरकुरीत व गोड असता

Comments

Popular posts from this blog

पेर चे प्रकार

पेर फळाचे उपयोग

पेर फळाचा इतिहास