पेर फळावरील रोग व कीड


 रोग व कीड :नेक्ट्रिया वंशातील कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे) होणारा सालीवरील खैरा रोग आणि व्हेंचुरिया पायरिना कवकामुळे होणारा खपली (खवडा स्कॅब) रोग हे प्रमुखपणे आढळतात. खैरा रोग झालेली मृत झाडे जाळून टाकणे, जिवंत झाडांच्या रोगट फांद्या कापून टाकणे व इतर भागांवर बोर्डो पेस्ट लावणे हे उपाय आहेत. खपली रोगासाठी चुना-गंधक मिश्रण फवारतात. सॅन ओझे या नावाच्या खवले कीटकांवर सफरचंदावरील त्या किडीप्रमाणे उपाययोजना करतात. पानावरील भुंगेरे डीडीटीच्या फवाऱ्याने नाहीसे करता येतात.

Comments

Popular posts from this blog

पेर चे प्रकार

पेर फळाचे उपयोग

पेर फळाचा इतिहास