पेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का?
पेर फळाचे आरोग्यदायी गुणधर्म माहिती आहेत का?
हाडे ठिसूळ होण्याच्या समस्येला वैद्यकीय भाषेमध्ये ऑस्टिओपोरोसिस असे म्हणतात. ऑस्टिओपोरोसिसमधे हाडे ठिसूळ होण्याची प्रक्रिया जास्त होते. द्रवपदार्थ आणि हाडांमधील चरबी त्यांचे घनत्व टिकवून ठेवण्यास मदत करतात. हे दोन्ही घटक आपले शरीर मजबूत ठेवण्यात मोठी भूमिका बजावतात. जेव्हा शरीरामध्ये कॅल्शिअमसह अन्य पोषक तत्त्वांचा अभाव निर्माण होतो, तेव्हा आपल्या हाडांमधील घनत्व कमी होऊ लागते. यामुळे शरीराची हाडे कमकुवत होऊ लागतात.
पेर फळाला बोली भाषेमध्ये नाशपाती या नावानंही ओळखले जाते. हे फळ एप्रिलपासून ते ऑक्टोबरपर्यंत बाजारामध्ये उपलब्ध असते. या फळाच्या सेवनामुळे शरीराला भरपूर आरोग्यदायी लाभ मिळतात. पण यातील पोषक घटक आपल्या हाडांसाठी सर्वाधिक फायदेशीर असतात.
पेरमध्ये आपल्या शरीराचे पीएच स्तर संतुलित ठेवण्याची क्षमता असते. या फळामध्ये बोरोना नावाचे तत्त्व असते. बोरोना आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असते. कारण हे आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या कॅल्शियम तयार करण्यास मदत करते. हे कॅल्शिअम आपल्या हाडांना बळकटी देण्याचे कार्य करतात आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या वेदनादायक समस्यांपासून आपले संरक्षण करते.
ज्या लोकांची हाडे कमकुवत होऊ लागतात, अशा लोकांमध्ये ऑस्टिओपोरोसिस होण्यापूर्वी हाडांमध्ये तीव्र वेदना होणे ही सामान्य बाब आहे. हाडांमध्ये वेदना होण्याचा त्रास कधीही उद्भवू शकतो किंवा नियमित देखील राहू शकतो. ही लक्षणे प्रत्येक रुग्णाच्या वेगवेगळ्या कारणांवर अवलंबून असतात. एखाद्या व्यक्तीला ऑस्टिओपोरोसिस आजार झाल्यास त्याचे शरीर पोकळ आणि कमकुवत होते. या धोकादायक आजाराला स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी आहारामध्ये पेर फळाचा समावेश करावा.

Comments
Post a Comment